Samsung Galaxy : आजकाल दमदार कॅमेरा असलेले अनेक फोन्स मार्केटमध्ये येत आहेत. यातच Samsung कंपनीच्या एका फोनचा कॅमेरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, दिग्गज उद्योगपती Elon Musk यांनाही या कॅमेऱ्याने भुरळ घातली आहे. मस्क यांना Samsung चा प्रीमियम स्मार्टफोन Galaxy S23 Ultra खूप आवडला असून, त्यांनी या मोबाईलच्या एका व्हिडिओवर "wow" अशी प्रतिक्रियाही दिली आहे.
मस्क यांची प्रतिक्रियामायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने Samsung Galaxy S23 Ultra मोबाईलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने 100x झूम करत थेट चंद्राचा फोटो काढल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर रिप्लाय देताना मस्क यांनी "wow" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मोबाईलमध्ये 200MPचे सेंसरदरम्यान, हा फोनची सध्या खूप चर्चा आहे. या फोनमध्ये कंपनीने 200MP सेंसर दिला आहे. यात अडॅप्टिव्ह पिक्सल्स दिले असून, यामुळे फोटो क्वालिटी खूप चांगली येते. कंपनीचा दावा आहे की, Super Quad Pixel AF द्वारे सब्जेक्टवर 50 परसेंट वेगाने फोकस केले जाते. तसेच, याचा फ्रंट कॅमेरा ड्युअल पिक्सल ऑटोफोकस टेक्नोलॉजीसह येतो.