ट्विटरवर लोकसभा इलेक्शन २०१९ सर्वाधिक चर्चेत; नरेंद्र मोदींचे ट्विट ठरले गोल्डन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 05:04 AM2019-12-11T05:04:59+5:302019-12-11T06:02:56+5:30

लोकसभा इलेक्शन २०१९, चांद्रयान २, सीडब्ल्यूसी १९ (क्रिकेट वर्ल्ड कप), पुलवामा, आर्टिकल ३७० हे हॅशटॅग पहिल्या पाच क्रमांकावर राहिले.

 Lok Sabha Election 2019 Most Discussed on Twitter; Golden tweets of PM Narendra Modi | ट्विटरवर लोकसभा इलेक्शन २०१९ सर्वाधिक चर्चेत; नरेंद्र मोदींचे ट्विट ठरले गोल्डन

ट्विटरवर लोकसभा इलेक्शन २०१९ सर्वाधिक चर्चेत; नरेंद्र मोदींचे ट्विट ठरले गोल्डन

Next

मुंबई : २०१९ या वर्षात ट्विटरवर सर्वात जास्त चर्चा लोकसभा इलेक्शन २०१९, चांद्रयान २ सीडब्ल्यूसी १९ या हॅशटॅगची झाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर केलेले ट्विट सर्वात अधिक वेळा लाइक व रीट्विट झाले, त्यामुळे त्याला गोल्डन ट्विटचा मान मिळाला आहे.

क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीने एम.एस.धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे ट्विट सर्वात अधिक वेळा रीट्विट करण्यात आले व सर्वात जास्त जणांनी ते लाइक केले. लोकसभा इलेक्शन २०१९, चांद्रयान २, सीडब्ल्यूसी १९ (क्रिकेट वर्ल्ड कप), पुलवामा, आर्टिकल ३७० हे हॅशटॅग पहिल्या पाच क्रमांकावर राहिले.

मनोरंजन क्षेत्रात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान व विजय हे पहिल्या पाच क्रमांकावर होते, तर महिलांमध्ये सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, अर्चना कल्पथ्री, प्रियांका चोप्रा हे पहिल्या पाच क्रमांकावर राहिले असल्याचे पाहायला मिळाले.

क्रीडा क्षेत्रात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, तर महिला क्रीडापटूंमध्ये पी. व्ही. सिंधू, हिमा दास, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मिताली राज हे पहिल्या पाच क्रमांकावर राहिले.

राजकारण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ, तर महिलांमध्ये स्मृती इराणी, प्रियांका गांधी वडेरा, सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन, ममता बॅनर्जी पहिल्या पाच क्रमांकावर राहिले.

यांनाही पसंती

मनोरंजन क्षेत्रात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांना पसंती.

क्रीडा क्षेत्रात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग ठरले हिट.

Web Title:  Lok Sabha Election 2019 Most Discussed on Twitter; Golden tweets of PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.