स्मार्टफोन बाजारात गेले कित्येक दिवस Lenovo जास्त सक्रिय नसल्याचे दिसत होते. कंपनी सध्या फक्त आपल्या सब-ब्रँड Motorola अंतगर्त अनेक स्मार्टफोन लाँच करत आहे. परंतु कंपनीने आज लेनोवो ब्रँडिंगसह नवीन मोबाईल सादर केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Lenovo K13 असून हा स्मार्टफोन रशियात सादर करण्यात आला आहे. हा एक अँड्रॉइड गो फोन आहे, त्यामुळे हा लो बजेट सेंग्मेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Lenovo K13 चे स्पेसिफिकेशन्स
लेनोवो के13 मध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला डिस्प्लेला सपोर्ट करतो. प्लॉस्टिक बॉडीसह येणारा हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. या फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत, परंतु खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन IP52 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.
प्रोसेसिंगसाठी Lenovo K13 मध्ये UNISOC SC9863A प्रोसेसर आणि आईएमजी8322 जीपीयू मिळतो. जे अँड्रॉइड 10 Go edition ऑपरेटिंग सिस्टमसाठी पुरेसे आहेत. या फोनमध्ये 2GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. लेनोवो के13 मध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह लेनोवो के13 फोनमध्ये 10वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरीला देण्यात आली आहे.
Lenovo K13 ची किंमत
Lenovo K13 फक्त एकाच मॉडेलसह रशियात सादर करण्यात आला आहे. ज्यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. Lenovo K13 ची किंमत RUB 7,777 ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 7,750 रुपयांच्या आसपास होते. हा फोन भारतासह जगभरात कधी येईल याची कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही.