जियोफोन नेक्स्ट कमी किंमतीत लाँच झाला आहे. परंतु या प्राईस सेगमेंटमध्ये आधीपासूनच खूप स्पर्धा आहे. त्यात आता TECNO Mobile कंपनीच्या लो बजेट Tecno Spark Go 2022 ची भर पडू शकते. हा फोन लवकरच बाजारात येणार आहे. हा फोन अँड्रॉइड गो एडिशनसह लाँच केला जाईल, तसेच यात 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा रियर कॅमेरा असे फीचर्स मिळतील.
Tecno Spark Go 2022
टेक्नो स्पार्ट गो 2022 स्मार्टफोनचे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह सादर केला जाईल. फोन उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. हा Turquoise Cyan आणि Atlantic Blue अशा दोन रंगात बाजारात येईल.
लीक रिपोर्टनुसार, आगामी टेक्नो फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. अँड्रॉइड गो आधारित या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो चिपसेट मिळू शकतो. त्याचबरोबर 2 GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क गो 2022 स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात प्रायमरी सेन्सर 13 मेगापिक्सलचा असेल, असे फोटोजमधून समजले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या स्वस्त टेक्नो स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.