शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

मस्तच! आता घरबसल्या तपासा 'या' महिन्यात गॅस सिलिंडरवर तुम्हाला किती मिळणार सबसिडी?; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 3:59 PM

Subsidy on LPG Gas Cylinder : फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सबसिडी मिळणार आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. जाणून घ्या, नेमकं कसं?

नवी दिल्ली - दर महिना अथवा दी़ड महिन्याने गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) हा बुक केला जातो. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत दिलासा देण्यासाठी सबसिडीची सुविधा देण्यात येते. LPG गॅस सबसिडी (Subsidy on LPG gas cylinder) प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी आहे. दरम्यान ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी ही सुविधा मिळत नाही. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सबसिडी मिळणार आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. जाणून घ्या, नेमकं कसं?

इंडेन गॅसचं ऑनलाईन स्टेटस असं करा चेक

- तुम्हाला सर्वात आधी इंडेनची अधिकृत वेबसाइट  https://bit.ly/3rU6Lol वर जावं लागेल

- सिलिंडरचा एक फोटो असेल, त्यावर क्लिक केल्यावर कंप्लेंट बॉक्स दिसेल. त्यामध्ये Subsidy Status लिहून proceed वर क्लिक करा.

- आता Subsidy Related (PAHAL) यावर क्लिक करायचं आहे. त्याठिकाणी असणाऱ्या Sub Category काही नवीन पर्याय दिसतील. त्याठिकाणी Subsidy Not Received वर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाका.

- मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर आयडीचा एक पर्याय आहे. त्याठिकामी तुम्हाला गॅस कनेक्शन आयडी द्या.

- यानंतर व्हेरिफाय करून सबमिट करा

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या समोर सबसिडीची पूर्ण माहिती येईल. किती सबसिडी तुम्हाला मिळाली आहे आणि किती पाठवण्यात येणार आहे. याशिवाय तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क साधून सबसिडी संदर्भात माहिती मिळवू शकता. इंडेन कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक 1800-233-3555 आहे. याठिकाणी देखील तुम्हाला कस्टमर केअर आयडी विचारला जाईल.

फेब्रुवारीमध्ये दोन वेळा महागला गॅस सिलिंडर

फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. सुरुवातीला 4 फेब्रुवारी रोजी मेट्रो शहरात इंडेन, एचपीने सबसिडी नसणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली होती. ही वाढ प्रति सिलेंडर 25 रुपये होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये प्रति सिलिंडर वाढ करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरtechnologyतंत्रज्ञान