नवी दिल्ली : देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया अॅप एलिमेंट्स (Elyments) रविवारी लाँच करण्यात आले. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नवीन सोशल मीडिया अॅपला लाँच केले. हे अॅप एक हजाराहून अधिक आयटी व्यावसायिकांनी विकसित केले आहे. हे प्रफेशनल्स श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे वॉलिंटियर्स सुद्धा आहे.
Elyments अॅप लाँच करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, "भारत एक आयटी पॉवरहाऊस आहे आणि आपल्याकडे या क्षेत्रात जगातील काही नामांकित लोक आहेत. इतके सारे टॅलेंटेड प्रफेशनल्स असताना आपल्याला आगामी काळात अशाप्रकारे आणखी इनोव्हेशन केले पाहिजे."
सोशल मीडियाच्या दुनियेत हे अॅप फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम सारख्या लोकप्रिय अॅपशी स्पर्धा करेल. हे अॅप सध्या 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि 1 लाखाहून अधिक वेळा गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड केले गेले आहे. प्ले स्टोअरच्या मते, या अॅपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या मित्रांशी संपर्क साधू शकतात, गप्पा मारू शकतात. याशिवाय अनलिमिडेट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलचा आनंद घेता येणार आहे. अॅप डेव्हलर्सचे म्हणणे आहे की, गोपनीयता अतिशय महत्वाची मानली गेली आहे आणि त्याचे सर्व सर्व्हर भारतात आहेत.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आत्मनिर्भर भारत मोहिमेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत उद्योजक व नवोदितांना देशात अॅप्स विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, भारत सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यानंतर मेड इन इंडिया अॅप्समध्ये झपाट्याने वाढ झाली.
आणखी बातम्या...
"...तर मला आनंद झाला असता", संजय राऊतांच्या 'रोखठोक'ला देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
"हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो"
मुलानं पब्जीच्या नादात उडवले 16 लाख; वडिलांनी धडा शिवण्यासाठी त्याला लावलं 'या' कामाला...
BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा
मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...
कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर