शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

देशाचे सर्वाधिक सुपर हीरो महाराष्ट्रात; परमपासून सुरू झालेला प्रवास एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:00 IST

केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

- योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जग एआयची चर्चा करीत असताना भारतातील सुपर कॉम्प्युटर्स चर्चेत आले आहेत. भारतीय आयटी तज्ज्ञांचा जगात दबदबा आहे. डॉ. विजय भटकरनिर्मित परम सुपरकॉम्प्युटरपासून सुरू झालेला प्रवास आता एआयसमृद्ध 'ऐरावत'पर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करीत असून देशभरातील ३४ सुपरकॉम्प्युटर्सपैकी सर्वाधिक अकरा महासंगणक महाराष्ट्रात आहेत.

केंद्र सरकारच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या मंत्रालयाने २०१५ साली ४.५ हजार कोटींच्या निधीसह नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन सुरू केले. यातून ३४ सुपरकॉम्प्युटर्स तयार झाले. ते शैक्षणिक, आयआयटी, आयआयएससी, सीडॅकसारख्या संस्था व प्रयोगशाळांमध्ये बसविण्यात आले. यापैकी सर्वाधिक ११ सुपरकॉम्प्युटर्स महाराष्ट्रात आहेत.

संपूर्ण स्वदेशी सुपर काॅम्प्युटिंग क्षमता : ‘एनएसएम’चे उद्दिष्ट होते- सुपर कॉम्प्युटिंगमध्ये स्वावलंबन व जागतिक नेतृत्व. यासोबतच सुपरकॉम्प्युटरची रचना, विकास, उत्पादन यावरदेखील विविध प्रयोग सुरू आहेत. देशात आता पूर्णपणे स्वदेशी सुपर कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानाची क्षमता निर्माण झाली आहे.

राज्यातील सुपर कॉम्प्युटर्ससीडॅक-पुणे : १. परम सिद्धी, २. बायोइन्फॉर्मेटिक्स ३. संगम ४. परम श्रेष्ठ ५. परम एम्ब्रियो ६. परम नील ७. परम विद्या ८. परम संपूर्ण.आयआयटी-मुंबई : परम रुद्र, आयआयएसईआर-पुणे : परम ब्रह्म, एनसीआरए-पुणे : परम रुद्र.

परम रुद्र तीन शहरांतस्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले तीन परम रुद्र सुपरकॉम्प्युटर तयार करण्यात आले असून ते पुणे, दिल्ली व कोलकाता येथे इन्स्टॉल करण्यात आले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान