शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 6:02 PM

या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा समोर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे.

हल्ली सायबर हल्ल्याची प्रकरणे सातत्याने समोर येताना दिसून येत आहे. यातच सायबर हल्ल्याचे आणखीन एक मोठे प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये हॅकर्सनी ९९५ कोटी पासवर्डची चोरी झाली आहे. हे प्रकरण म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक मानला जात आहे. या घटनेमुळे सायबर सुरक्षेतील कमकुवतपणा समोर आला असून लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली आहे.

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, bamaCare नावाच्या हॅकर टीमने ९९५ कोटी पासवर्ड लीक केले आहेत. ही माहिती Rockyou2024 नावाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हा डेटा लीक ऑनलाइन सर्व्हिससाठी वापरल्या जाणाऱ्या पासवर्डचा सर्वात मोठा ग्रुप आहे. या डेटा लीकमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या वैयक्तिक माहितीचा समावेश असल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे. हॅकर्सनी बेकायदेशीरपणे अनेक ऑनलाइन अकाउंट्समध्ये प्रवेश केला आणि पासवर्ड व इतर वैयक्तिक माहिती चोरली. या लीकमुळे अनेक कर्मचाऱ्यांची तसेच सर्वसामान्यांची माहिती उघड झाली आहे.

ईमेल आणि लॉगिनची माहितीही धोक्यातपासवर्ड व्यतिरिक्त, या डेटा लीकमध्ये ईमेल अॅड्रेस आणि लॉगिनची माहिती देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ हॅकर्स एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी या माहितीचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे या घटनेवरून असे लक्षात येते की, आपला वैयक्तिक डेटा किती असुरक्षित आहे?

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती मोहीम सायबर सुरक्षेच्या या मोठ्या घटनेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांकडून सायबर सुरक्षेची काळजी घेण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याची माहिती मागवली आहे. याशिवाय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

पासवर्ड सुरक्षतेसाठी काय करावे?मजबूत पासवर्ड वापरा : लहान आणि साध्या पासवर्डऐवजी लांब आणि गुंतागुंतीचे पासवर्ड तयार करा.पासवर्ड नियमितपणे बदला : तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदला.टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा : यामुळे तुमच्या अकाउंट्सची सुरक्षा वाढते.सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवा : सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती आणि जागरूक रहा. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी