बँक खात्यांसाठी अनेक अॅप्स धोकादायक ठरत आहेत. अशा अॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या शिवाय, गुगल आणि अॅप्पलही त्यांच्या सिस्टीममध्ये अनेक बदल करत आहेत. आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी या प्रक्रियेच्या माध्यमाने अशा सर्वच गोष्टींचा सामना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारत सरकारने सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेत नुकतेच साधारणपणे 500 अॅप्सवर बंदी घातली होती. हे अॅप्स कुणीही डाऊनलोड अथवा वापरू शकत नाही. खरे तर, अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अॅप्सवर सरकारकडून सातत्याने कारवाई केली जाते. याच बरोबर, यासंदर्भात अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यावर कारवाई करत या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Meta चाही एक नवा अहवाल समोर आला होता. बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात रिसर्च केला जात होता. यात बहुतांश एडिटिंग सॉफ्टवेअर, यूजर्सची खासगी माहिती मिळवत आहेत. विशेष म्हणजे ही माहिती यूजरच्या परवानगी शिवाय घेतली जात आहे. हे धोकादायक आहे. Google देखील अशा सॉफ्टवेअरवर अथवा अॅप्सवर कार्रवाई करत असते. अनेक सॉफ्टवेअर यूजरकडून यासंदर्भात परवानगी मागत नाहीत. यामुळेच, केव्हाही स्मार्टफोनमध्ये एखादे अॅप डाउनलोड करताना त्याचा रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की बघा. असे करणे अत्यंत आवश्यक आहे.