फेसबुकने आपल्या कंपन्यांच्या ग्रुपची वर्षभरापूर्वी बनविलेली मेटा कंपनी मेटाकुटीला आली आहे. मेटाच्या महसुलात पहिल्यांदाच घट झाली आहे. याचा थेट परिणाम मेटाच्या मालकीच्या मॅसेंजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर देखील झाला आहे. यामुळे कंपनी व्हॉट्सअॅप विकण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार मेटाचा एकूण महसूल १ टक्क्याने घसरला आहे. यामुळे मेटाचे उत्पन्न जवळपास 28.8 बिलियन डॉलर म्हणजेच 23 हजार अब्ज रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्येही महसुलात मोठी तूट होण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे. तिसऱ्या तिमाहीत हा महसूल 20 हजार अब्ज रुपये एवढा खाली येऊ शकतो. फेसबुकशिवाय मेटाचा एकूण नफा ३६ टक्क्यांनी घटला आहे. हा फायदा 6.7 अब्ज डॉलर एवढा झाला आहे. फेसबुकचा मेटाव्हर्सवर मोठी योजना आहे. यामुळे यात कंपनीने अब्जावधी डॉलर्स गुंतविले आहेत. हे मार्क झकरबर्गचे स्वप्न आहे आणि त्यावर खास डिव्हीजन Reality Labs काम करत आहे. या डिव्हिजनने गेल्या तिमाहीत 2.8 अब्ज डॉलर्सचा तोटा नोंदविला होता.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनीने WhatsApp वर सर्वाधिक पैसा गुंतविला होता. मात्र, कंपनीला यातून काही फायदा होताना दिसत नाहीय. झकरबर्गला इन्स्टाग्रामवर लोकांना खिळवून ठेवायचे आहे. यासाठी इन्स्टाला ते TikTok सारखे बनविण्याच्या प्रयत्नात आहेत.
परंतू फेसबुकला महिला आणि तरुणांनी, अल्पवयीनांनी काहीशी नापसंती देण्यास सुरुवात केली आहे. ते फेसबुकवर जास्त सक्रीय नसतात. यामुळे कंपनीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. याशिवाय अॅपल कंपनीने देखील फेसबुकविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. फेसबुक अॅपद्वारे युजरला टार्गेट करणाऱ्या जाहिरातदारांना अॅपल ब्लॉक करू लागली आहे. याचा मोठा परिणाम फेसबुकच्या रिव्हेन्यूवर झाला आहे. WhatsApp जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिंग अॅप आहे, परंतू त्यावरून इन्स्टासारखा रेव्हेन्यू मिळत नाहीय.
2012 मध्ये इंस्टाग्राम $1 अब्जांना विकत घेतले होते. त्याने २०१९ मध्ये फेसबुकला २० अब्ज डॉलर्सचा नफा कमवून दिला. त्यानंतर झकरबर्गने व्हॉट्सअॅप १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतले होते.