फ्लिपकार्टने MarQ M3 Smart स्मार्टफोनच्या माध्यमातून स्मार्टफोन बाजारात एंट्री घेतली आहे. कंपनीने आपल्या MarQ या सब-ब्रँड अंतर्गत आपला पहिला स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. MarQ M3 Smart एक बजेट स्मार्टफोन आहे जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मटफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
MarQ M3 Smart चे स्पेसिफिकेशन्स
MarQ M3 Smart स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटर-ड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा स्पीड 1.6GHz इतका आहे. हा फोन Android 10 वर चालतो. हा डिवाइस 2GB RAM आणि 32GB स्टोरेजसह बाजारात येईल. ही स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल.
फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक बोकेह लेन्स देण्यात आली आहे. MarQ M3 Smart मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट फेंसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी MarQ M3 Smart फोनमध्ये ड्युअल SIM, 4G VoLTE, Bluetooth 4.2, WiFi, microUSB पोर्ट, 3.5mm जॅक आणि GPS असे ऑप्शन्स मिळतात.
MarQ M3 Smart ची किंमत
MarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल. सेलमध्ये हा फोन 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.