Meta Supercomputer RSC: Facebook ची पॅरेंट कंपनी Meta जगातील सर्वात वेगवान AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) सुपरकंप्यूटर बनवणार आहे, अशी घोषणा कंपनीनं केली आहे. या सुपर कंप्यूटरचा वापर कंपनीच्या Metaverse प्रोजेक्टचा बेस तयार करण्यासाठी केला जाईल. हा कंप्यूटर यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत अस्तित्वात येईल आणि हा जगातील सर्वात वेगवान कंप्यूटर असेल.
सुपरकंप्यूटर सामान्य कंप्यूटरच्या तुलनेत कितीतरी वेगवान मशीन असते. सुपरकंप्यूटर जटिल कॅल्क्युलेशन्स अगदी सहज सोडवतो. Meta नं दिलेल्या माहितीनुसार या सुपरकंप्यूटरचं नाव AI Research SuperCluster असं असेल. परंतु हा कुठे ठेवण्यात येईल किंवा त्याला बनवण्यासाठी येणारा खर्च कंपनीनं सांगितला नाही.
या कंप्यूटरच्या मदतीनं आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर रिसर्च करणारे इंजीनियर नवीन आणि चांगले आर्टिफिशियल इंटेलिजेंस मॉडेल बनवू शकतील. तसेच यात कोट्यवधी उदाहरणं, फोटोज, व्हिडीओज तसेच इतर भाषांमध्ये करण्यात आलेली कामं आणि त्यांचं विश्लेषण करू शकतील. RSC नवीन एआय सिस्टम डेव्हलप करण्यास मदत करेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. त्यामुळे एक साथ अनेक भाषांमध्ये रियल टाइम व्हॉइस ट्रांसलेशन करता येईल. तसेच यामुळे एक साथ AR गेम देखील खेळता येतील.
हे देखील वाचा: