सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल किंवा मेसेज करून ऑनलाइन स्पॅमर्स आता युजर्सची फसवणूक करत आहेत. अशा बनावट कॉल्सला रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप सायलेन्स अननोन कॉलर्स फीचर आणणार आहे, ज्यामध्ये यूजर्स अनोळखी नंबरवरून येणारे कॉल म्यूट करू शकतील. अलीकडेच हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्सला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सपासून वाचवू शकते. हे फिचर अज्ञात नंबरवरून येणारे कॉल म्यूट करतं. तुम्ही नोटिफिकेशन सेंटर आणि कॉल टॅबमध्ये हे म्यूट कॉल पाहू शकाल. याच्या मदतीने कोणी फोन केला होता हे कळू शकणार आहे. या फीचरच्या मदतीने फ्रॉड कॉल आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासूनही सुटका होणार आहे.
Silence Unknown Callersगेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने व्हॉट्सअॅप कम्युनिटी फीचर लाँच केले होते. पण या फिचरमध्ये एक मोठी कमतरता आढळली. यात एकत्र जोडलेले ग्रूप मेंबर्स एकमेकांचे मोबाइल क्रमांक पाहू शकत होते. अशा परिस्थितीत स्पॅम कॉलची संख्या वाढली. पण आता व्हॉट्सअॅपने स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी एका फीचरवर काम सुरू केले आहे. सध्या हे फिचर विकसित होत आहे.
नवीन फीचर अशा प्रकारे काम करेलरिपोर्टनुसार, व्हॉट्स अॅपच्या सेटिंग्जमध्ये 'सायलेन्स अननोन कॉलर्स'चा पर्याय उपलब्ध असेल. यूझर्स ते सुरू करून फ्रॉड कॉल्सपासून मुक्त होऊ शकतात. या फीचरमुळे प्रँक, स्पॅम आणि त्रासदायक कॉल्स थांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, या नवीन फीचरच्या मदतीने यूझर्सना खूप फायदा होणार आहे.