MG हेकिटरचं फेसलिफ्ट व्हर्जन MG हेक्टर २०२१ हे ७ जानेवारी रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. MG हेक्टर २०२१ मध्ये पहिल्यांदाच हिंग्लिश व्हॉईस कमांडचं नवं फीचर मिळणार आहे. यामुळे कारच्या निरनिराळ्या फीचर्सचा वापर करताना आता हिंग्लिश व्हॉईस कमांड्सही देता येतील. ही कार ३५ पेक्षा अधिक हिंग्लिश व्हॉईस कमांड्स समजू शकते आणि त्यानुसार कामही करू शकते. उदाहरणार्थ 'एफएम चलाओ', 'टेम्परेचर कम कर दो' अशा व्हॉईस कमांड्सद्वारे त्या फीचर्सचा उपयोग करून घेता येणार आहे. २०२१ MG हेक्टरमध्ये वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (फर्स्ट इन सेगमेंट), ब्लॅक इंटिरिअरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.MG हेक्टर दोन वर्षांपूर्वी भारतात लाँच करण्यात आली होती. MG हेक्टरची एक्स शोरूम किंमत १२.८३ लाख रूपयांपासून सुरू होती. MG हेक्टर फेसलिफ्टमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेल्सप्रमाणेच १.५ लिटर पेट्रोल इंजिन आणि २.० लिटर डिझेल इंजिन असणार आहे. तसंच या कारमध्ये एमजी डिझेल इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध करेल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ७ सीटर हेक्टर प्लस होणार लाँच७ सीटर MG हेक्टर प्लस हीदेखील ७ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या कारमध्ये २.० लिटर टर्बो डिझेल इंजिन आणि १.५ लिटर पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. पेट्रोल इंजिनसोबतच 48-V माईल्ड डायब्रिड सिस्टम आणि ७ स्पीड डीसीटी गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. ६ सीटर MG हेक्टर प्लस ही जुलै २०२० मध्ये भारतात लाँच करण्ंयात आली होती.
MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच
By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 11:35 AM
७ जानेवारी रोजी लाँच होणार नवी कार, भारतीयांसाठी असणार खास फीचर
ठळक मुद्दे७ सीटर हेक्टर प्लसही होणार लाँचनव्या कारमध्ये भारतीयांसाठी हिंग्शिलचं देण्यात आलंय नवं फीचर