Xiaomi Mi 11X 5G सध्या कमी किंमतीत विकत घेता येत आहे. देशातील प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही हा फोन डिस्काउंट आणि कॅशबॅकसह विकत आहेत. हा स्मार्टफोन 8GB RAM, 48MP Camera, Snapdragon 870 प्रोसेसर, आणि 33W फास्ट चार्जिंगसह आला आहे. चला जाणून घेऊया याचे स्पेक्स आणि ऑफर.
Mi 11X 5G ची किंमत आणि ऑफर
या फोनच्या छोट्या 6GB RAM मॉडेलची किंमत 27999 रुपये आहे. तर 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 29999 रुपये आहे. Amazon वरून खरेदी करताना HDFC बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक आणि HSBC बँकेच्या कार्डवर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. तसेच फ्लिपकार्टवरून हा फोन 895 रुपयांच्या EMI वर विकत घेता येईल.
Mi 11X चे स्पेसिफिकेशन्स
Mi 11X फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1,080×2,400 पिक्सल रिजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह बाजारात आला आहे. सोबत 8GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX582 प्रायमरी सेन्सर, 8MP ची सेकंडरी सेन्सर अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,520mAh बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.
हे देखील वाचा: