गेल्या आठवड्यात शाओमीने आपल्या Smarter Living 2022 इव्हेंटच्या माध्यमातून Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्स भारतात सादर केले होते. आज म्हणजे 31 ऑगस्टपासून या लॅपटॉप्सच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. या दोन्ही लॅपटॉप्समध्ये 11th जेनरेशन इंटेल कोर प्रोसेसर, Intel Iris Xe ग्राफिक्स आणि Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्सची किंमत आणि ऑफर्स.
Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro ची किंमत
Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्स आज दुपारी 12 वाजल्यापासून Mi.com, Amazon, आणि Mi Home stores वर खरेदीसाठी उपलब्ध होतील. अॅमेझॉनवर HDFC Bank क्रेडिट, डेबिट कार्ड आणि ईएमआय द्वारे हे लॅपटॉप्स विकत घेतल्यास 4,500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. तर Mi.com या लॅपटॉप्ससोबत 750 रुपयांचे Play-and-Win कुपन मोफत मिळेल.
लॅपटॉप मॉडेल | किंमत (रुपये) |
---|---|
Mi NoteBook Pro (i5/8GB RAM) | 56,999 |
Mi NoteBook Pro (i5/16GB RAM) | 59,999 |
Mi NoteBook Pro (i7/16GB RAM) | 72,999 |
Mi NoteBook Ultra (i5/8GB RAM) | 59,999 |
Mi NoteBook Ultra (i5/16GB RAM) | 63,999 |
Mi NoteBook Ultra (i7/16GB RAM) | 76,999 |
Mi NoteBook Ultra चे स्पेसिफिकेशन्स
Mi NoteBook Ultra लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3200x2000 पिक्सल रिजोल्यूशन, 16: 9 अस्पेक्ट रेशियो, 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या लॅपटॉपमध्ये एक एचडी वेबकॅम मिळतो. हा लॅपटॉप Intel Core i7-11370H CPU आणि Intel Iris Xe जीपीयूसह बाजारात आला आहे. हा Windows 10 Home वर चालणारा लॅपटॉप 16GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD स्टोरेजला सपोर्ट करतो.
कनेक्टिविटीसाठी Mi NoteBook Ultraमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, थंडरबोल्ट 4 पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमधील 70Whr बॅटरी 12 तासांची बॅटरी लाईफ देते आणि 65 वॉट फास्ट चार्जिंगने चार्ज करता येते.
Mi NoteBook Pro चे स्पेसिफिकेशन्स
Mi NoteBook Pro मध्ये 14 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2560x1600 पिक्सल, अस्पेक्ट रेशियो 16:10 आणि ब्राईटनेस 300 निट्स आहे. यात देखील 11th जेनरेशन Intel Core i7 प्रोसेसरसह Intel Iris Xe देण्यात आला आहे. तसेच 16GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज मिळते. आहे. कनेक्टिविटी आणि ऑडियो फिचर अल्ट्रा मॉडेलसारखे आहेत. परंतु या लॅपटॉपमध्ये 56Whr बॅटरी देण्यात आली आहे, जी 11 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.