शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

लो बजेट Micromax In 2b वर मिळवा 1,000 रुपयांची सूट; आज पासून खरेदीसाठी उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Published: August 06, 2021 11:42 AM

Micromax In 2b First Sale: Micromax In 2b स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6GB रॅम, Unisoc T610 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 

Micromax In 2b स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. गेल्या महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे ज्यात कंपनीने 6GB रॅम, 5000mAh  बॅटरी, अँड्रॉइड 11 आणि Unisoc T610 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. मायक्रोमॅक्स इन 2बी स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये Flipkart आणि Micromaxinfo.com वरून विकत घेता येईल.  

Micromax In 2b ची किंमत  

Micromax In 2B स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये आणि 6GB + 64GB व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Micromax In 2b स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या बिग सेविंग डेज सेल आणि Micromaxinfo.com वरून आज दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल. हा फोन ICICI आणि Axis बँकेच्या कार्डद्वारे विकत घेतल्यास 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

Micromax In 2B चे स्पेसिफिकेशन्स  

मायक्रोमॅक्स इन 2बी मध्ये तिन्ही बाजूंनी बेजल लेस असलेला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. हा एक 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 400निट्स ब्राइटनेस देतो. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 2 ARM Cortex A75 CPU असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T610 चिपसेट आणि अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये जी52 जीपीयू मिळतो.   

Micromax In 2B च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सरसह एक 2 मेगापिक्सलची सेकंडरी एआय लेन्स कंपनीने दिली आहे. या मायक्रोमॅक्स फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. Micromax In 2B मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर देखील मिळते. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आहे.   

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड