शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी 

By सिद्धेश जाधव | Published: February 26, 2022 3:44 PM

Micromax In 2c: Micromax In 2c स्मार्टफोन गुगल प्लेवर लिस्ट झाला आहे.

Micromax नं काही दिवसांपूर्वी भारतात Micromax In Note 2 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. बजेट सेगमेंटमध्ये आलेल्या या फोनमध्ये 4GB RAM, 48MP Camera आणि 5,000mAh Battery असे स्पेक्स देण्यात आले आहेत. आता आता मायक्रोमॅक्स एका लो बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे, जो Micromax In 2c नावानं भारतात एंट्री घेईल.  

आगामी Micromax In 2c गुगल प्लेवरील सपोर्टेड डिव्हाइसेसच्या यादीत दिसला आहे. टिपस्टर अभिषेक यादवनं स्पॉट केलेल्या या लिस्टिंगमध्ये हा फोन E6533 या मॉडेल नंबरसह दिसला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच या लिस्टिंगमधून देखील स्पेक्स समजले नाहीत. परंतु लवकरच स्वदेशी कंपनी मायक्रोमॅक्स चिनी कंपन्यांशी दोन हात करू शकते.  

Micromax IN Note 2 चे स्पेसिफिकेशन्स  

मायक्रोमॅक्स इन नोट 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा-वाईड अँगल, 2MP मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.  

Micromax IN Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच होल डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन स्टॉक Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Helio G95 प्रोसेसर मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी या मायक्रोमॅक्स फोनमध्ये टाईप-सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस देण्यात आलं आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. IN Note 2 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.   

हे देखील वाचा:

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान