Micromax भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करार आहे. कंपनीनं याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिली आहे. या ट्विटनुसार कंपनी Micromax In Note 2 लाँच करणार आहे. जो जुन्या Note 1 चा अपग्रेड व्हर्जन असू शकतो. ट्विटमधून कंपनीनं या आगामी स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती दिली आहे.
उद्या म्हणजे 25 जानेवारीला Micromax In Note 2 लाँच केला जाईल. कंपनीनं नवीन फोनच्या घोषणेसह एक टीजर देखील सादर केला आहे. या टीजरमधून Micromax In Note 2 ची डिजाइन समजली आहे. आगामी Micromax स्मार्टफोनच्या मागे ‘Dazzling Glass Finish’ म्हणजे चमकदार ग्लास फिनिश मिळेल.
टीजरनुसार हा फोन स्लिम बेझलचा सादर केला जाईल. तसेच यात एक पंच-होल असलेला डिस्प्ले मिळेल. या पंच-होलमध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. तर डिवाइसच्या मागे चार कॅमेरे असतील, त्याखाली iN ब्रँडिंग असेल. या स्मार्टफोनचे ब्लू आणि ब्राऊन असे दोन कलर व्हेरिएंट बाजारात येईल. जे फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येतील.
जुन्या Micromax In Note 1 स्पेसिफिकेशन्स
Micromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, 2 एमपी मॅक्रो आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
WhatsApp ग्रुप अॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास
60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित