मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच भारत गो या नावाने अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) या नावाने नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली असून याचे सर्व फिचर्स जाहीर करण्यात आले आहे.
गुगलने ÷अत्यंत किफायतशीर दरातल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीचे सर्व फिचर्स प्रदान करण्यासाठी याची अँड्रॉइड गो या नावाने नवीन प्रणाली सादर केली आहे. भारतातील काही स्मार्टफोन उत्पादकांनी यावर आधारित मॉडेल्सदेखील सादर केले आहेत. आता मायक्रोमॅक्स कंपनीने याच प्रणालीवर चालणारे भारत गो हे नवीन मॉडेल सादर करण्याचे संकेत दिले आहेत. याचे अधिकृत लाँचींग करण्यात आले नसले तरी याचे सर्व फिचर्स विविध संकेतस्थळांवर देण्यात आले आहेत. यानुसार हा स्मार्टफोन शँपेन आणि ब्लॅक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.
मायक्रोमॅक्स भारत गो या मॉडेलमध्ये ४.५ इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण असणार आहे. याची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर यामध्ये २,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. यात ओटीजीचा सपोर्टदेखील देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनच्या एका बाजूला ‘स्मार्ट की’ प्रदान करण्यात आली असून याच्या मदतीने विविध फंक्शन्सला शॉर्टकट पध्दतीत वापरता येणार आहे. याचे मूल्य मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी हा स्मार्टफोन अतिशय किफायतशीर दरात सादर करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे