मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. यू युरेका २ या मॉडेलला मिड रेंज फ्लॅगशीप म्हणून गणले जात आहे. अर्थात यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यू युरेका २ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी ग्लासयुक्त वक्राकार डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ५२५ प्रोसेसर असेल. यू युरेका २ मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
यू युरेका २ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ऑटो-फोकस, ड्युअल एलईडी फ्लॅश, जिओ टॅगींग, टच फोकस, फेस डिटेक्शन, एचडीआर, पॅनोरामा आदी फिचर्स असतील. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने १०८० पिक्सल्स क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे.
यू युरेका २ या मॉडेलमध्ये ३९६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असेल. यू युरेका २ या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.