जगभरात AI तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर आता माक्रोसॉफ्टच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, त्यांनी कोणाच्याही नोकऱ्या जाणार नसल्याचे सांगितले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया ईडी समिक रॉय यांनी सांगितले की, एआय भविष्यातील नोकऱ्यांची लवचिकता आहे. यातून नोकऱ्यांना धोका नाही. एआयमुळे भविष्यात नोकऱ्या जाणार नाहीत.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणाले की, AI हे लोकांचे कौशल्य सुधारण्यासाठी आहे. जगात अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, पण जेव्हा नोकऱ्या निर्माण करण्याचा आणि प्रदान करण्याचा विचार येतो, तेव्हा आपण थोडे मागे जाऊ या, वीज, स्टीम इंजिन आणि संगणकाच्या सुरुवातीकडे. या सर्वांनी जग बदलले आहे. या गोष्टी जगासाठी नवीन होत्या, पण त्यांनी लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला.
भारतात संगणक आल्यावर देशात आयटी कंपन्या आल्या, ऑनलाइन व्यापार सुरू झाला, याचा अर्थ थेट नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. यावेळी आम्हाला AI सह आमचे कौशल्य सुधारावे लागेल. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, लोकांना फक्त एआय स्वीकारावे लागेल, असंही ते म्हणाले.
Ola मालकाची एआय सेक्टरमध्ये एन्ट्री!
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) युग आहे. गेल्या काही काळापासून एआय क्षेत्रात मोठी भर पडली आहे. बहुतेक कंपन्यांनी एआय उत्पादनांवर काम सुरू केले आहे. ओला कॅब्स (Ola Cabs) आणि ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric) संस्थापक भाविश अग्रवाल ( Bhavish Aggarwal) यांची एआय स्टार्टअप कंपनी कृत्रिम ( Krutrim) देखील लवकरच ग्राहकांसाठी आपले पहिले AI उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर (X) माहिती दिली आहे की, कृत्रिम कंपनीचे पहिले उत्पादन एआय चॅटबॉट असणार आहे. माहिती देण्यासोबतच ओला कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. कृत्रिम ॲपची रिलीजपूर्वी टेस्टिंग केली जात असून हे ॲप पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे.