Microsoft ने अधिकृतपणे Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम जारी केली आहे. आता जगभरातील लॅपटॉप आणि डेस्कटॉप युजर ही ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करू शकतात. नवीन फीचर्स आणि बदल असलेल्या Windows 11 सह कंपनीने Office 2021 देखील लाँच केले आहे. Windows 11 Update कुठून मिळवायचा आणि यात कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत हे जाणून घेऊया.
Windows 11 मधील नवीन फीचर्स
नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर युजर्स वेगाने काम करू शकतील, असा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. Windows 11 मधील युजर इंटफेस बदलण्यात आला आहे. यात नवीन स्टार्ट मेनू, सेंटर टास्कबार आणि मायक्रोसॉफ्ट स्टोर मिळेल. कंपनीने कॅलेंडर, पेंट, वेदर आणि स्पोर्ट्स लीडरबोर्डमध्ये देखील बदल केले आहेत. नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये सुधारित सिस्टम ट्रे, नोटिफिकेशन आणि क्विक अॅक्शन UI देण्यात आला आहे. Windows 11 चा अपडेट टप्प्याटप्प्याने युजरना दिला जाईल. सर्वप्रथम विंडोज 10 युजर्सना हा अपडेट मिळेल, त्यानंतर इतर युजर्स नवीन ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकतील.
असे करा Windows 11 वर अपडेट
- अपग्रेड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा लॅपटॉप किंवा कंप्यूटर या अपडेटसाठी पात्र आहे कि नाही ते बघा.
- यासाठी Microsoft चे अधिकृत PC Health Check App डाउनलोड करावे लागेल.
- त्यानंतर Windows Key + I एक साथ प्रेस करून सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Update & Security वर क्लिक करा.
- आता डावीकडे Windows 11 अपडेट चेक करा. त्यानंतर Check for Updates बटणवर क्लिक करा.
- जर तुमचा PC पात्र असेल तर तुम्हाला upgrade to Windows 11 is ready असा मेसेज मिळेल.
- आता Download and install वर क्लिक करा. असे केल्यावर डाउनलोडिंग सुरु होईल.
- डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यावर तुमचा पीसी विंडोज 11 वर रिबूट होईल.