शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक 2 प्रो : अनेक सरस फिचर्सने युक्त लॅपटॉप

By शेखर पाटील | Published: October 23, 2017 8:44 AM

मायक्रोसॉफ्ट कंपनीने सरफेस बुक २ प्रो हा नवीन लॅपटॉप जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१५ साली सरफेस बुक हे मॉडेल लाँच केले होते. आता याची पुढील आवृत्ती सरफेस बुक २ प्रो या नावाने बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे. या माध्यमातून अ‍ॅपलच्या मॅकबुक प्रो या मॉडेलला जोरदार टक्कर देण्याचा मायक्रोसॉफ्टचा इरादा असल्याचे दिसून येत आहे. हा लॅपटॉप १३.५ आणि १५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील १३.५ इंची मॉडेलमध्ये ३००० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा, ३:२ अस्पेक्ट रेशो असणारा आणि पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल. तर १५ इंची मॉडेलमध्ये ३४०० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अनुक्रमे सातव्या पिढीतील कोअर आय५-७३००यू आणि आठव्या पिढीतील कोअर आय७-८६५०यू हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० आणि जीटीएक्स १०६० या ग्राफीक्स कार्डची जोड देण्यात आलेली असेल. यात ८ आणि १६ जीबी रॅमचे पर्याय असतील. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत. 

सरफेस बुक २ प्रो या मॉडेलमध्ये अत्यंत दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १७ तासांपर्यंत चालत असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. दोन्हींमध्ये फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. डॉल्बी ऑडिओ प्रिमीअमसह यात स्पीकर देण्यात आले आहेत. तसेच यात अतिशय उत्तम दर्जाचे दोन मायक्रोफोनही असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आणि एक्सबॉक्स वायरलेसचा इनबिल्ट सपोर्ट असेल. यासोबत दोन युएसबी ३.० टाईप-ए पोर्ट, एक युएसबी टाईप-सी पोर्ट, कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदींची सुविधादेखील असेल. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, मॅग्नेटोमीटर व अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यात सरफेस पेनच्या मदतीने रेखांकन करता येईल. विशेष म्हणजे याला सरफेस डायल या उपकरणाचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.

सरफेस बुक २ प्रो हे मॉडेल टु-इन-वन या प्रकारातील आहे. अर्थात ते लॅपटॉप तसेच (कि-बोर्ड काढून) टॅबलेट म्हणूनही वापरता येणार आहे. हे मॉडेल लॅपटॉप, टॅबलेट, स्टँडर्ड आणि व्ह्यू मोड या चार प्रकारांमध्ये वापरता येतील.  हा लॅपटॉप ६४ बीट विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असेल. यात मायक्रोसॉफ्टचे सर्व प्रॉडक्टिव्हिटी टुल्स वापरता येतील. याच्या मदतीने थ्री-डी मॉडेलींग, गेमिंगचा आनंद घेता येईल. याला विंडोज मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष करून डिजीटल आर्टीस्ट आणि प्रोफेशनल्ससाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील अनेकविधी सरस फिचर्समुळे हा लॅपटॉप संगणकापेक्षाही गतीमान व उपयुक्त असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आले नसून ९ नोव्हेंबरपासून याची नोंदणी सुरू होणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान