शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

अँटीव्हायरसच बनला 'व्हायरस', बिघडवला सगळा खेळ! इंस्टॉलेशनपूर्वी ही खबरदारी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 1:50 PM

Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टचे काल जगभरात सर्व्हर बंद झाल्यामुळे अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले, यामुळे जगभरातील विमान सेवांवरही परिणाम झाला.

Microsoft Windows Outage - मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काल जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. जगभरामध्ये विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रिनचा एरर दिसत होता. दरम्यान, कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बहुतांश विंडोड युझर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ एरर दिसत आहे. ही अडचण हल्लीच्या क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे. या अडचणीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत, असं सांगण्यात आले होते. पण, ही समस्या कशामुळे आली याची जोरदार चर्चा सुरू आहे. CrowdStrike ने एक चुकीचे अपडेट केले, यामुळे जगभरात खळबळ उडाली. चुकीच्या अपडेटमुळे विमान वाहतूक क्षेत्र, बँकिंग, आयटी क्षेत्र आणि अगदी लंडन स्टॉक एक्सचेंजचे सर्व्हरही ठप्प झाले.   

Amazon Prime Day Sale 2024 : १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल

काल रात्री तीन वाजल्यापासून पुन्हा एकदा सर्व सुरळीत सुरू झाले आहे. याशिवाय जगभरातील इतर सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. हा प्रोब्लेम कशामुळे आला. यासाठी आधी  क्राउडस्ट्राइकचे मायक्रोसॉफ्टशी कनेक्शन समजून घ्या? जागतिक सायबर सुरक्षा फर्म CrowdStrike च्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक समस्येमुळे, सर्व्हर ठप्प झाले आणि अभियंते पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहेत. CrowdStrike चे काम Windows डिव्हाइसेस आणि इतर क्लायंटसाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर देणे आहे, कंपनीने जारी केलेल्या अँटीव्हायरस अपडेटमधील समस्येमुळे हे घडले आहे. म्हणजेच कंपनीचा अँटीव्हायरसच व्हायरस बनला आहे.

कंपनीने अँटीव्हायरस अपडेट देण्यापूर्वी त्याची योग्य चाचणी का केली नाही? जेव्हा सर्व्हर डाउन झाल्यानंतर कंपनीने चाचणी सुरू केली, तेव्हा कंपनीला एक बग सापडला, जर ही चाचणी योग्य प्रकारे केली असती, तर अँटीव्हायरसमध्ये बग सापडला नसता आणि तो रिलीजपूर्वी निश्चित केला असता. मात्र तसे न झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सायबर हल्ले आणि व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी, विंडोज संगणकांमध्ये क्राउडस्ट्राइक नावाचे सॉफ्टवेअर वापरले जाते. अनेक मोठ्या कंपन्या या अँटी व्हायरसचा वापर त्यांच्या सिस्टीमच्या सुरक्षेसाठी करतात.

Crowdstrike पुढे आव्हान काय?

अँटीव्हायरस अपडेटमुळे काही सिस्टीम थांबल्या आहेत तर काही रीस्टार्ट मेसेज दाखवत आहेत. यामुळे आता कंपनीपुढे हे मोठे आव्हान आहे.  रिमोट ऍक्सेसद्वारे ही समस्या सोडवणे हे मोठे आव्हान आहे आणि जर हे काम मॅन्युअली केले तर खूप वेळ लागू शकतो. 

Antivirus घेण्याआधी ही घ्या काळजी

सायबर हल्ल्यांपासून आणि व्हायरसपासून सिस्टमचे संरक्षण करण्यासाठी, आपण आपल्या सिस्टिमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल करतो. पण यावेळी कळजी घ्यावी लागते.  यात थर्ड-पार्टी साइट्स किंवा अज्ञात साइटवरून अँटीव्हायरस विनामूल्य डाउनलोड करुन इनस्टॉल करण्याची चूक करु नका.असं केल्यास तुमच्या सिस्टममध्ये बग, व्हायरस, मालवेअर किंवा इतर समस्या येऊ शकतात.

तुमच्या सिस्टमसाठी अँटीव्हायरस सबस्क्रिप्शन फक्त अँटीव्हायरस ऑफर करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकृत साइटवरून खरेदी करा, अन्यथा तुम्ही फ्रीबीजसाठी सिस्टम सेव्ह करण्याचा विचार कराल आणि यामुळे तुमच्यावर विपरीत परिणाम होईल. यामुळे सिस्टीममध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल करताना ही काळजी घ्या.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडो