शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

बापरे! Instagram च्या 4.9 कोटी हाय-प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:05 AM

फेसबुकचा डेटा लीक झाल्याची घटना समोर असतानाच आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक झाला आहे.

ठळक मुद्देफेसबुकचा डेटा लीक झाल्याची घटना समोर असतानाच आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक झाला आहे. प्रसिद्ध फूड ब्लॉगर, राजकारणी, सेलिब्रिटींचा यामध्ये समावेश आहे.

नवी दिल्ली - फेसबुकचा डेटा लीक झाल्याची घटना समोर असतानाच आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये प्रसिद्ध फूड ब्लॉगर, राजकारणी, सेलिब्रिटींचा समावेश आहे. टेकक्रंचने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या जवळपास 4 कोटी 90 लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. यामध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या फॉलोवर्सची संख्या, काही खासगी माहिती, प्रोफाईल फोटो, लोकेशन  आणि पर्सनल कॉन्ट्रक्ट यासारख्या गोष्टी लीक झाल्या मुंबईच्या सोशल मीडिया मार्केटींग फर्म चार्टबॉक्सने याबाबतची माहिती दिली आहे.  मुंबईतील एक सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी Chtrbox ने याबाबतची माहिती ट्रेस केल्याचं टेकक्रंचने म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच आपला डेटाबेस ऑफलाईन केला  आहे. सिक्यॉरिटी रिसर्चर अनुराग सेन यांना सर्वप्रथम याबाबतची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी टेकक्रंचला याबाबत अलर्ट केले होते.

इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन नंबर आणि ईमेलची माहिती आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास सुरू तसेच यापुढे डेटा लीक होऊ नये यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. 

Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अ‍ॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अ‍ॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे. 

Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदत

इन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. इन्स्टाग्रामच्या प्रवक्यांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अशाप्रकारचं फीचर आणण्यासाठी विचार करत होतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.

Instagram वर आता व्हिडीओ रिवाइंड करता येणारइन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम apk फाइलमध्ये @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ सीक बारची चाचणी घेत आहे. तसेच एखाद्या व्हिडीओच्या सीक बारवर क्लिक करून कोणत्याही सेकंदावर घेऊन जाऊन तो व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचा फटका हा काही युजर्सना बसणार आहे. कारण आधी रिवाइंडचा पर्याय उपलब्ध नसल्याने युजर्स एका व्हिडीओवर बराच वेळ थांबून राहत होते. मात्र आता या फीचर नंतर ते इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात. इन्स्टाग्रामचं व्हिडीओ रिवाइंडचे हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

आता इन्स्टाग्रामवर सुद्धा करा शॉपिंग, नवीन फीचर लाँच! 

सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इन्स्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम फेसबुकचीच एक कंपनी आहे. या कंपनीने एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.' याचबरोबर, इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान