स्मार्टफोन अॅक्सेसीरीज आणि स्मार्टवॉच लाँच करणाऱ्या स्वदेशी ब्रँड Minix ने भारतात आपला नवीन स्मार्टवॉच Minix Hawk लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच Minix Hawk नावाने सादर करण्यात आला आहे. यात SpO2 सेन्सर आणि हार्ट रेट सेन्सर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया Minix Hawk स्मार्टवॉचची किंमत, फीचर आणि स्पेसिफिकेशन्स.
Minix Hawk चे स्पेसिफिकेशन्स
Minix Hawk स्मार्टवॉचमध्ये SPO2 सेन्सर आणि हार्ट रेट मॉनिटरींग असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यात अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. ज्यात सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, स्वीमिंग आणि स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजचा समावेश आहे.
Minix Hawk स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा चौरसाकृती डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 240×280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 180mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी फक्त दोन तासात फुल चार्ज होते. हा वॉच मध्ये 128MB मेमरीसह बाजारात आला आहे. कंपनीने यात HRS3300 हार्ट रेट सेन्सरचा वापर केला आहे. त्याचबरोबर Realtek RK8762C मास्टरचिप देण्यात आली आहे. यात IP67 वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्स देण्यात आला आहे.
Minix Hawk ची किंमत
Minix Hawk स्मार्टवॉचची किंमत 2,699 रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉच ई-कॉमर्स साईटवरून विकत घेता येईल. यासाठी कंपनीने ब्लॅक, ब्लू आणि ग्रे असे तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध केले आहेत.