लोकमत न्यूज नेटवर्क : मुलांच्या हातातील खेळणे बनलेल्या मोबाइल गेम्सवर लगाम लावण्यासाठी कम्युनिस्ट चीन सरकारने कठोर निर्णय घेतला. चीनच्या निर्णयाचे भारतीय पालकांनी कौतुक केले. कारण भारतीय तरुण, विद्यार्थिदशेतील मुले रोज पाच तास मोबाइलमध्ये डोके खुपसून असतात, असे नुकतेच निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोबाईल नवे संकट घेऊन येणार असून आत्ताच सावध व्हावे लागणार आहे.
चीनचा निर्णय काय?चीन सरकारने अलीकडेच मोबाइल गेमिंगवर निर्बंध आणले. चीनमधील मुलांना आठवड्यातील केवळ तीनच तास मोबाइलवर गेम खेळता येणार आहे.चीन सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. चीनसारखा नियम आपल्याही देशात लागू व्हावा, अशी इच्छाही अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.
प्रत्यक्ष परिस्थिती काय?nभारतातील तरुण, विद्यार्थिदशेतील मुले रोज पाच तास मोबाइलवर व्यस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.nविवध गेम्स डाऊनलोड करून ते ऑनलाइन खेळणे याला प्राधान्य दिले जाते.nफ्री फायर, पब्जी व तत्सम गेम्स अधिक प्रमाणात खेळले जातात.nयाशिवाय विविध ॲप्सही तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.