लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आता अगदी साध्या, इंटरनेट नसलेल्या फोनच्या मदतीनेही एकमेकांना पैसे पाठवता येणार आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी यासाठी स्वतंत्र यूपीआय योजना सादर केली आहे. याला यूपीआय१२३पे नाव देण्यात आले आहे.
डिजिटल पेमेंटसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. याचे नाव डीजीसाथी देण्यात आले आहे. यूपीआय१२३पेच्या मदतीने वापरकर्ते अगदी साध्या फोनवरून यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. स्कॅन आणि पे वगळता सर्व प्रकारचे व्यवहार याद्वारे केले जाऊ शकतात. यामुळे पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक आणि बँक खाते लिंक करावे लागेल.
गावागावांमध्ये डिजिटल व्यवहारn यूपीआय पेमेंटची सुरुवात २०१६ मध्ये झाली. आतापर्यंत यूपीआय पेमेंटसाठी स्मार्टफोन आवश्यक होता. n यामुळे ग्रामीण भागातील ४० कोटी जणांना डिजिटल व्यवहार करता येत नव्हते. n गावांमध्ये अनेकांकडे स्मार्टफोन नसतो तसेच इंटरनेटचीही समस्या असते. आरबीआयच्या नव्या सेवेमुळे प्रत्येक गावात डिजिटल व्यवहार वाढणार आहेत.
एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.
ओटीपी, सीव्हीव्ही कुणालाही देऊ नकागव्हर्नर दास यांनी सायबर सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. अनेक जण पैशांच्या लोभाने मोबाइलवर आलेला ओटीपी आणि डेबिट कार्डवरील सीव्हीव्हीसारखी महत्त्वाची माहिती देतात. यामुळे फसवणूक होते. अशी कोणतीही माहिती देणे टाळावे, असे ते म्हणाले.