नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण घरात असल्यामुळे इंटरनेटचा मोठ्याप्रमाणात वापर करत आहेत. याचा फायदा अनेक अॅप असणाऱ्या कंपन्यांना होत आहे.
या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपचा डाऊनलोडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांनतर झूम अॅप युजर्सच्या प्रायव्हसीवरून वादात अडकले आहे. गुगल आणि टेस्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अॅप वापरण्यास मनाई केली आहे. यातच अशी माहिती येते की, झूम अॅपचे पाच लाख अकाऊंच झाले असून डेटा डार्क वेबवर विकला जात आहे.
ब्लीपिंग कम्प्युटरने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आहेत आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात आहे. यासंबंधी सर्वात आधी एक एप्रिलला सायबर सिक्युरिटी फर्म Cyble ने माहिती दिली होती. रिपोर्टनुसार, डार्क वेबवर झूम अॅप युजर्सचा डेटा $0.0020 म्हणजे जवळपास 0.15 प्रति अकाऊंट विकले जात आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॅकर्सला आधीच माहिती होती, त्यामुळे नक्कीच पासवर्ड आणि आयडी हॅक केला आहे.
झूम अॅप युजर्सचा जो डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचला आहे, त्यामध्ये ई-मेल आयडी, पासवर्ड, मिटिंगचा युआरएल आणि होस्ट यांसदर्भातील माहिती आहे. तसेच, यामध्ये २९० अकाऊंट हे कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांच्याशी जोडले आहेत. ज्या युजर्स डेटा लीक झाला आहे. त्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वर्मोंट, डार्टमाऊथ, लाफयेते, फ्लोरिडा युनिव्हर्सिटी, कोलोराडो युनिव्हर्सिटी आणि सिटी बँक यांसारख्या कंपन्यांच्या नावाचा समावेश आहे.