Motorola नं 2020 मध्ये Moto G Stylus नावाचा अनोखा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची ओळख यातील स्टायलस होती. आता पुन्हा एकदा कंपनीनं Moto G Stylus 2022 कोणताही गाजावाजा न करता यूएसमध्ये सादर केला आहे. यात 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असे स्पेक्स देण्यात आले आहेत.
परंतु Moto G Stylus 2022 मधील स्टायलस पेन सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हा पेन स्मार्टफोनच्या तळाला असेलेल्या जागेत इन्सर्ट करून ठेवता येतो. ज्याच्या मदतीनं नोट्स लिहता येतात तसेच स्केच देखील काढता येतात. चला जाणून घेऊया या फोनचे अन्य स्पेसिफिकेशन्स.
Moto G Stylus 2022 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Helio G88 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 6GB रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. मोटो जी स्टायलस 2022 अँड्रॉइड 11 बेस्ड माय यूएक्स इंटरफेसवर चालतो.
मोटो जी स्टायलस 2022 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी फोनला पावर बॅकअप देते.
Moto G Stylus 2022 ची किंमत
Moto G Stylus 2022 स्मार्टफोन Twilight Blue आणि Metallic Rose कलरमध्ये विकत घेता येईल. याची किंमत 399 डॉलर्स (जवळपास 29,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
हे देखील वाचा:
19GB RAM च्या ताकदीसह OPPO Reno 7 Pro 5G भारतात लाँच; मिळतेय DSLR सारखी कॅमेरा सिस्टम