Motorola सध्या जास्तच सक्रिय झाल्याचं दिसतं आहे. कंपनीनं अलीकडेच भारतात अनेक स्मार्टफोन्स सादर केले आहेत, ज्यात Moto G71 या 5G फोनचा देखील समावेश आहे. सध्या कंपनी Moto G Stylus 2022 देखील तयारी करत आहे. आता लाँच पूर्वीच या फोनचा प्रोमो व्हिडीओ लीक झाला आहे. या लीकनुसार हा स्मार्टफोन पंच होल डिजाइन, नाईट विजन मोड असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 2 दिवसांच्या बॅटरी लाईफसह बाजारात येईल.
Moto G Stylus 2022 चे लीक स्पेसिफिकेशन्स
हा पंच होल डिस्प्ले आणि स्लिम बेजल्ससह सादर केला जाईल. ज्यात स्टायलस सपोर्ट आणि सिक्योरिटीसाठी एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलची डिजाईन पाहता सहा स्मार्टफोन आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.
या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असू शकतो. फोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळेल. यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळू शकते. अँड्रॉइड 11 वर चालणारा हा फोन 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. सोबत बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स असलेला हा फोन अंदाजे 30,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा: