भारतात या वर्षाच्या मार्च महिन्यात मोटो जी ५ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला होता. या मॉडेलचे तीन जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेज हे मॉडेल १४,९९९ तर चार जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट १६,९९९ रूपये मुल्यात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. यातील जार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजच्या मूल्यात तीन हजारांनी कपात करण्यात आली आहे. अर्थात आता हा स्मार्टफोन १३,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येईल. सध्या तरी ३ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य कायम ठेवण्यात आले असले तरी त्यातही कपात होण्याची शक्यता आहे.
मोटो जी ५ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. यातील इनबिल्ट स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइड ७.० नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह प्रॉक्झीमिटी सेन्सर, अॅक्सलेरोमीटर, अँबिअंट लाईट सेन्सर आणि गायरोस्कोप असतील. तसेच हे मॉडेल फोर-जी नेटवर्क सपोर्टयुक्त असेल.