मोटोरोलाने आपला नवीन बजेट फ्रेंडली 5G Phone चीनमध्ये Moto G51 नावाने सादर केला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 480+ चिपसेट, 5000mAh Battery देण्यात आली आहे. या स्वस्त फोनमध्ये ट्रिपल मागे 50MP Camera देखील देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Moto G51 स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये.
Moto G51 price
Moto G51 चीनमध्ये 1,499 युआनमध्ये सादर करण्यात आला आहे, म्हणजे सुमारे 17,500 रुपये. ही किंमत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटची आहे. हा फोन ब्लु आणि ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन कधी उपलब्ध होईल हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही
Moto G51 चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G51 मध्ये 6.8-इंचाचा पंच होल असलेला एलसीडी डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे या डिवाइसमध्ये 2.2GHz स्पीड असलेला Qualcomm Snapdragon 480+ SoC देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत कंपनीने 3GB वर्चुअल रॅम देखील दिला आहे.
फोटोग्राफी सेगमेंटबद्दल बोलायचे झाले तर, Moto G51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा मुख्य सेन्सर, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा थर्ड सेन्सर मिळतो.
Moto G51 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे, जो 5G, Wi-Fi 5, Bluetooth v5.2, GPS, USB Type-C port आणि 3.5mm ऑडिओ जॅक अशा कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे.