Flipkart नं 27 जानेवारी म्हणजे आजपासून Electronics Sale सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, स्मार्ट टीव्ही, फ्रिज आणि एसी मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. परंतु यातील सर्वात आकर्षक ऑफर मोटोरोलाच्या Moto G60 वर उपलब्ध झाली आहे. सेलमध्ये 21,999 रुपयांचा हा फोन फक्त 149 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Moto G60 ची किंमत आणि डिस्काउंट
Moto G60 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये हा फोन 22 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे याची किंमत 16,999 रुपये होते. तसेच हा स्मार्टफोन विकत घेताना सिटी बँकेच्या कार्डचा वापर केला तर 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल आणि फोन 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
परंतु खरी ऑफर जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून Moto G60 खूप कमी किंमतीत विकत घेऊ शकता. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्ही 18,850 रुपये वाचवू शकता. त्यामुळे 21,999 रुपयांचा हा फोन फक्त 149 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स
Moto G60 मध्ये 6.82 इंचाचा मोठा Max Vision FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वालकॉमचा Snapdragon 732G चिपसेट देण्यात मिळतो. सोबत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो.
Moto G60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह Quick Charge 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: