मोटोरोलाची ‘एज 20’ सीरिज 17 ऑगस्टला भारतात सादर केली जाणार आहे, याची घोषणा कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरून केली आहे. तत्पूर्वी कंपनीने ब्राजीलमध्ये Moto G60s स्मार्टफोनची घोषणा केली आहे. हा फोन भारतात लाँच झालेल्या Moto G60 पेक्षा वेगळा आहे. ब्राजीलमध्ये Moto G60s ची किंमत BRL 2,499 (सुमारे 35,800 रुपये) ठेवण्यात आली आहे.
Moto G60s चे स्पेसिफिकेशन
Moto G60s स्मार्टफोन 6.8-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर Helio G95 SoC आणि माली-G76 MC4 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते. Moto G60s स्मार्टफोन Android 11 वर चालतो. सिक्योरिटीसाठी यात एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
Moto G60s स्मार्टफोनमध्ये मागे क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
हा ड्युअल सिम मोटोरोला स्मार्टफोन वाय-फाय 802.11 b/g/n/ac, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, 4G, NFC, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB टाइप-C पोर्ट अश्या कनेक्टिव्हिटी ऑप्शन्सना सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.