शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Xiaomi-Realme ची होणार हवा टाईट; भारतात येणार Motorola चे तीन दमदार फोन 

By सिद्धेश जाधव | Published: November 19, 2021 7:31 PM

Motorola Moto G71, G51 And G31India Launch Price: Motorola लवकरच आपले नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यात Moto G71 5G Phone, G51 5G आणि G31 चा समावेश असेल.

Motorola ने जागतिक बाजारात आपल्या G सीरिज अंतर्गत सहा स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, ज्याची सुरुवात Moto G71, G51 आणि G31 होणार असल्याचे दिसत आहे. कारण हे फोन भारतीय सर्टिफिकेशन साईट बीआयएसवर लिस्ट झाले आहेत. त्यामुळे या फोन्सचा भारतीय लाँच नजीक असल्याचे संकेत मिळाले आहेत.  

टिप्सटर यशने बीआयएसवर मोटोरोलाचे तीन फोन स्पॉट केले आहेत. हे डिवाइस XT2169-1, XT2171-2 आणि XT2173-2 या मॉडेल नंबरसह लिस्ट झाले आहेत. यातील Moto G71 स्मार्टफोन XT2169-1, Moto G51 XT2171-2 आणि Moto G31 XT2173-2 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लीकमधून अचूक लाँच डेट समोर आली नाही, तसेच कंपनीने देखील कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

Motorola Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंसाठी यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.  

Moto G71 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. या कॅमेऱ्याला 8MP च्या अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा लेन्सची जोड देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Moto G51 चा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात LED फ्लॅश असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. ज्याला 2MP च्या मॅक्रो कॅमेरा आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.   

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Moto G51 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट, गुगल असिस्टंट बटन, IP52 रेटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Moto G51 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. तसेच हा फोन ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU ला सपोर्ट करतो. कंपनीने हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या मोटोरोलाच्या 5G Phone मधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान