मुंबई : लिनोव्हा कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या मोटरोला कंपनीने आपल्या मधल्या फळीतील Moto P30 हा मोबाईल लाँच केला आहे. या फोनमध्ये आयफोन एक्स सारखा डिस्प्ले दिला आहे. सध्या यामध्ये अँड्रॉईड ओरियो 8.0 हे सॉफ्टवेअर असले तरीही त्यावर गुगलने नुकतेच लाँच केलेले पाय हे सॉफ्टवेअर अपडेट केले जाणार आहे.
आयफोन कंपनीने गेल्या वर्षातच आयफोन 8 आणि X हे दोन फोन लाँच केले होते. मात्र, iPhone X ची म्हणावी तशी विक्री झाली नाही. या फोनची हुबेहुब कॉपी Motorola ने बाजारात आणली आहे. आयफोन एक्स सारखा डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 18.7:9 आहे. तसेच 1.8 गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोससर वापरण्यात आली आहे. तसेच ओरियो 8.0 मध्ये ZUI 4.0 ही ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
किंमत किती? सध्या हा फोन चीनमध्ये 15 सप्टेंबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज मिळणार आहे, याची किंमत 2,099 युआन म्हणजेच भारतीय रुपयांत 21,400 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6 जीबी रॅम/ 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 2,499 युआन (25,400 रुपये) असणार आहे. हा फोन निळा, काळा आणि पांढऱ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
फिचर्सहा फोन 6.2 इंच फुल एचडी+ डिस्प्ले, रिझॉल्युशन 1080x2246 पिक्सल आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबी मेमरी वाढविली जाते. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. एक कॅमेरा 16 मेगापिक्सल एफ/1.8 अॅपर्चरचा आणि दुसरा कॅमेरा 5मेगापिक्सल एफ/2.2 अॅपर्चरचा असणार आहे. बॅटरी 3000 एमएएच देण्यात आली आहे.
मोटरोलाच्या या फोनना मिळणार PieMoto Z3, Moto Z3 Play, Moto Z2 Force Edition, Moto Z2 Play, Moto X4, Moto G6, Moto G6 Play, Moto G6 Plus या स्मार्टफोनना लवकरच Android Pie या ऑपरेटिंग सिस्टिमची अपडेट मिळणार आहे.