मोटोरोलानेटॅबलेट सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. कंपनीने आपला नवीन टॅबलेट Moto Tab G20 नावाने भारतात सादर केला आहे. हा टॅब बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला असून याची विक्री Flipkart Big Billion Days सेलमधून करण्यात येईल. Moto Tab G20 टॅबलेटमध्ये Android 11, MediaTek Helio P22T प्रोसेसर आणि 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto Tab G20 स्पेसिफिकेशन्स
Moto Tab G20 टॅबलेटमध्ये 8-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1280 x 800 पिक्सल रिजोल्यूशन, 350 निट्स ब्राईटनेस आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 85 टक्के आहे. Tab G20 टॅबलेटमध्ये कंपनीने MediaTek Helio P22T प्रोसेसरचा वापर केला आहे. ज्याला IMG GE8320 650 GPU ची जोड देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या या टॅबलेटमध्ये 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड वापरून 2TB पर्यंत वाढवता येते.
या टॅबमध्ये Android 11 OS चा स्टॉक व्हर्जन देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 5MP चा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2MP चा फ्रंट कॅमेरा वापरता येईल. Moto Tab G20 मध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Moto Tab G20 ची किंमत
Moto Tab G20 टॅबलेटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मोटोरोलाचा हा टॅब 2 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल. Flipkart Big Billion सेलमध्ये या टॅबवर 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ICICI आणि Axis बँकेच्या कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळेल.