शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 6:14 PM

Motorola Edge 20 & Edge 20 Pro Specs: TENNA लिस्टिंगमधून मोटोरोलाच्या मॉडेल नंबर XT2143-1 आणि XT2153-1 अश्या दोन स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Motorola ची आगामी Edge 20 सीरिज लवकरच बाजारात दाखल होऊ शकते. यापूर्वी या सीरिजची बरीचशी माहिती लीकमधून समोर आली आहे. आता एज 20 सीरीजचे स्मार्टफोन TENAA वर लिस्ट झाले आहेत. TENNA लिस्टिंगमधून मोटोरोलाच्या मॉडेल नंबर XT2143-1 आणि XT2153-1 अश्या दोन स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या स्मार्टफोन्सची नावे क्रमशः Moto Edge 20 (Berlin 2021) आणि Motorola Edge 20 Pro (Pstar) अशी असू शकतात.  

Moto Edge 20 (XT2143-1) चे लीक स्पेसिफिकेशन्स 

TENAA लिस्टिंगवरून समजले आहे कि मोटोरोलाच्या आगामी Edge 20 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल असेल. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.4GHz फ्रीक्वेंसीसह देण्यात येईल. मोटोरोलाचा हा फोन 6GB, 8GB, आणि 12GB अश्या तीन रॅम ऑप्शन्ससह सादर केला जाईल. Android 11 आधारित या स्मार्टफोनमध्ये 3760mAh ची बॅटरी देण्यात येईल. लीक रिपोर्ट्सनुसार Moto Edge 20 मध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर आणि 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल.  

Moto Edge 20 Pro (XT2153-1)चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Moto Edge 20 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल असेल. TENAA लिस्टिंगमध्ये यातील 3.2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. हा Android 11 स्मार्टफोन 6GB, 8GB, आणि 12GB रॅम अश्या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. Edge 20 Pro च्या 3C लिस्टिंगनुसार हा फोन 4230mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जला सपोर्ट करू शकतो. यापूर्वी आलेल्या लीक रिपोर्ट्सनुसार हा फोन Qualcomm Snapdragon 870 SoC, आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड