Motorola ने आज भारतात आपल्या ‘Edge 20’ सीरिजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion हे दोन स्मार्टफोन देशात सादर केले आहेत. यातील मोटरला एज 20 भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका 5G स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने लाँचच्या वेळी केला आहे. हे लेखात आपण Motorola Edge 20 च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती घेणार आहोत.
Motorola Edge 20 चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 20 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट देणार आहे.
हे देखील वाचा: जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच
फोटोग्राफीसाठी Motorola Edge 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मोटोरोला एज 20 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी 33W TurboPower फास्ट चार्जींगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Xiaomi Redmi 10 च्या चिपसेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या गेमिंग चिपसेटसह येणार बाजारात
Motorola Edge 20 ची किंमत
Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Motorola Edge 20 स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 27 ऑगस्टपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Frosted Emerald आणि Frosted Pearl कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.