Motorola ने आज आपली ‘एज 20‘ सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. मोटो एज 20 सीरीजची खासियत म्हणजे हे तिन्ही स्मार्टफोन 108MP च्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. हे फोन्स सध्या युरोपियन बाजारात सादर झाले असून लवकरच जगभरात लाँच केले जातील. या सीरिजमधील सर्वात स्वस्त आणि छोट्या मोटोरोला एज 20 लाइटची माहिती इथे क्लिक केल्यावर मिळू शकते. पुढे आम्ही मोटोरोला एज 20 आणि एज 20 ची माहिती दिली आहे.
Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाने या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मोटोरोला एज 20 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आहे तर मोटोरोला एज 20 प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट मिळतो. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी या दोन्ही मोटोरोला फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहेत. सेल्फीसाठी दोन्ही फोन्समध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. मोटोरोला एज 20 मध्ये 4,000एमएएचची बॅटरी 33W TurboPower फास्ट चार्जींगसह देण्यात आली आहे. तर मोटोरोला एज 20 प्रो मधील 4,500एमएएच बॅटरी 30W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro ची किंमत
मोटोरोलो एज 20 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 499.99 युरो म्हणजे भारतीय करंसीनुसार 44,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला मोटोरोला एज 20 प्रो €699.99 म्हणजे सुमारे 60,000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.