Motorola Edge 30 स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. हा भारतातील Qualcomm Snapdragon 778G Plus SoC प्रोसेसरसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन आहे. तसेच यात 144Hz रिफ्रेश रेट, 50MP रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते. हा स्मार्टफोन जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असल्याचा दावा मोटोरोलानं केला आहे.
Moto Edge 30 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला एज 30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाईनसह यात 144हर्टज रिफ्रेश रेट मिळतो. हा अँड्रॉइड 12 डिवाइस माययूएक्सवर चालतो. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटची टाकत डिवाइसमध्ये देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी Moto Edge 30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह OIS सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची 118डिग्री अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मोटोरोला मोटो एज 30 मध्ये मिळतो.
फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हा फोन आयपी52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला मोटो एज 30 स्मार्टफोनमध्ये 4,020एमएएचची बॅटरी 33वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Motorola Edge 30 ची किंमत आणि उपलब्धता
Motorola Edge 30 स्मार्टफोनचे भारतात दोन व्हेरिएंट आले आहेत. 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल असेलल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अरोरा ग्रीन या मेटें ग्रे कलर ऑप्शनमध्ये 19 मेपासून Flipkart, Reliance Digital, आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.