Motorola नं भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro सादर केला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणारा देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. आता या लाईनअपमध्ये कंपनी Moto Edge 30 Lite जोडू शकते. 91 मोबाईल्सनं टिपस्टर Even Blass च्या हवाल्याने या स्मार्टफोनच्या कोडनेम आणि काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
रिपोर्टनुसार हा मोटोच्या या फोनचं कोडनेम Miami आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन म्हणजे OIS सपोर्टसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. तसेच क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात येईल. लीक रेंडरमधून या फोनच्या डिजाईनची माहिती देखील समोर आली आहे.
रेंडरनुसार, फोनमध्ये ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यासाठी एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मागे देण्यात येईल. रेंडरमध्ये ब्लॅक कलर व्हेरिएंट दाखवण्यात आला आहे. फोनच्या रियर पॅनलवर मोटोरोलाला लोगो असेल. पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर बटन उजव्या पॅनलवर असतील.
Moto Edge 30 Lite चे स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये 6.5 इंचाचा pOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची स्टोरेज असू शकते. फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, X51 5G मॉडेम आणि अड्रीनो 619 GPU सह बाजारात येईल. फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर मिळू शकतो. यात 4020mAh ची बॅटरी देण्यात येईल. फोन ग्रीन फिग, मूनलेस नाईट, ओपल सिल्वर आणि वेरी पेरी कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो.