Motorola आपल्या एज सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीनं ट्विटरवरून Motorola Edge 30 च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. त्यानुसार हा फोन 12 मेला भारतात सादर करण्यात येईल. तसेच या फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. तसेच हा जगातील सर्वात पातळ 5G स्मार्टफोन असेल, असा दावा देखील मोटोरोलानं केला आहे.
Moto Edge 30 चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला एज 30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिजाईनसह यात 144हर्टज रिफ्रेश रेट मिळतो. हा अँड्रॉइड 12 डिवाइस माययूएक्सवर चालतो. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटची टाकत डिवाइसमध्ये देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी Moto Edge 30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलची 118डिग्री अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मोटोरोला मोटो एज 30 मध्ये मिळतो.
फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. हा फोन आयपी52 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला मोटो एज 30 स्मार्टफोनमध्ये 4,020एमएएचची बॅटरी 33वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Motorola Edge 30 ची भारतीय
Motorola Edge 30 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी युरोपात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 449.99 युरो (जवळपास 36,300 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. हा ऑरोरा ग्रीन, मेटियोर ग्रे आणि सुपरमून सिल्वर कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची भारतीय किंमत युरोपियन किंमतीच्या आसपास असू शकते.