मोटोरोलाने चीनमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘एज’ सीरिजमध्ये एक नवीन डिवाइस सादर केला आहे. लेनोवोच्या मालकीच्या मोटोरोला ब्रँडने Motorola Edge S Pro लाँच केला आहे. हा फोन याआधी आलेल्या Motorola Edge S चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन्सचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Motorola Edge S Pro ची किंमत
Motorola Edge S Pro स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. या फोनचा छोटा मॉडेल 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह 2399 युआन (अंदाजे 27,500) रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 2699 युआन (अंदाजे 31,000 रुपये), 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल 2999 युआन (अंदाजे 34500 रुपये) आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 3299 युआन (अंदाजे 37,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन भारतात कधी लाँच होईल याची माहिती मात्र अजून समजली नाही.
Motorola Edge S Pro चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge S Pro मध्ये 6.7-इंचाचा ओएलईडी होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा Turbo LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेजसह मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MYUI 2.0 स्किनवर चालतो.
या मोटोरोला स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 5x ऑप्टिकल झूम आणि 50x डिजिटल झूमला सपोर्ट करते. हा फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge S Pro मध्ये 4,520mAh ची बॅटरी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.