Motorola Moto Edge X पुढील महिन्यात चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असू शकतो. हा मान शाओमीला मिळणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. परंतु आता चित्र बदलू शकतं. इतकेच नव्हे तर जगातील सर्वात पहिला 200MP Camera असलेला फोन सादर करण्याचा कारनामा देखील मोटोरोलाच्या नावावर नोंदवला जाऊ शकतो.
Ice Universe आणि Digital Chat Station या लोकप्रिय टिपस्टर्सनी, Motorola च्या आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनी 200MP चा रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन काम करत आहे. हा फोन कोणत्या नावानं बाजारात येईल याची माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे याआधी शाओमी या मोठ्या कॅमेरा सेन्सरसह सर्वात पहिला फोन घेऊन येईल, अशा बातम्या येत होत्या.
Motorola 200MP Camera Phone
Ice Universe ने Xiaomi च्या 200MP कॅमेरा फोनची माहिती दिली आहे, त्यानुसार हा फोन देखील 2022 मध्ये येणार आहे. तसेच Samsung देखील 2023 मध्ये 200MP कॅमेरा सेन्सरचा वापर स्मार्टफोनमध्ये करू शकते. त्यामुळे 2022 च्या पूर्वार्धात Motorola च्या सॅमसंगच्या 200MP कॅमेरा सेन्सर असलेला फोन सादर करू शकते. असे जर झाले तर मोटोरोला अशाप्रकारचा फोन लाँच करणारी जगातील सर्वात पहिली कंपनी बनेल. परंतु ही माहिती सध्या फक्त लीक आहे, त्यामुळे जोपर्यंत हा फोन लाँच होत नाही तोवर काही निश्चित सांगणं कठीण आहे.