मोटोरोलाने आज भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने आपल्या ‘E सीरीज’ मध्ये Moto E40 स्मार्टफोन सादर केला आहे. 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5,000mAh ची बॅटरी आणि 4GB RAM सह हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया Moto E40 स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सची माहिती.
Moto E40 ची किंमत
कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये Moto E40 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 17 ऑक्टोबरपासून हा फोन Carbon Gray आणि Pink Clay रंगात विकत घेता येईल.
Moto E40 चे स्पेसिफिकेशन
मोटो ई40 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आयपीएस पॅनल 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनमध्ये Unisoc T700 प्रोसेसरचा वापर केला आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
कंपनीने हा फोन IP52 वॉटर रिपेलन्ट टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. यात कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आला आहे. सिक्योरिटीसाठी हा फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची मदत घेतो.
Moto E40 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 8-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Moto E40 मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.