शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणतेय जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन; भारतात करणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: December 29, 2021 6:05 PM

Motorola Moto Edge X30 5G Phone:  Motorola Moto Edge X30 5G स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. हा शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट असलेला जगातील पहिला फोन आहे.  

Motorola Moto Edge X30 5G Phone:  मोटोरोलानं या महिन्याच्या सुरुवातीला जगातील सर्वात शक्तिशाली चिपसेट असलेला अँड्रॉइड फोन सादर केला होता. कंपनीनं Moto Edge X30 5G सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला होता. हा शक्तिशाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट असलेला जगातील पहिला फोन आहे.  

आता या फोनच्या भारतीय लाँचची बातमी आली आहे. टेक वेबसाईट 91mobiles नं इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने याची माहिती दिली आहे. त्यानुसार मोटोरोलाचा हा फ्लॅगशिप फोन जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

Moto Edge X30 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Moto Edge X30 च्या स्पेक्समधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या फोनमधील Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट आहे. जो जुन्या क्वॉलकॉम प्रोसेसरपेक्षा कितीतरी वेगवान आहे. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी Adreno GPU दिला आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या वेगवान LPDDR5 RAM सह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 256GB पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते.  

Moto Edge X30 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन Android 12 OS वर आधारित MyUI 3.0 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

पॉवर बॅकअपसाठी Moto Edge X30 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या शक्तिशाली फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. Moto Edge X30 मध्ये 60 मेगापिक्सलचा शानदार फ्रंट कॅमेरा मिळतो.  

Moto Edge X30 ची किंमत  

  • Moto Edge X30 8GB/128GB: 3,199 युआन (सुमारे 38,000 रुपये)   
  • Moto Edge X30 8GB/256GB: 3399 युआन (सुमारे 40,300 रुपये)   
  • Moto Edge X30 12GB/256GB: 3,599 युआन (सुमारे 42,700 रुपये)   

हे देखील वाचा: 

Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे

फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :Motorolaमोटोरोलाtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड