Motorola नं या महिन्यात आपल्या ‘जी सीरीज’ अंतगर्त अर्धा डझन स्मार्टफोन्स सादर केले होते. हे फोन्स युरोपियन बाजारात आले आहेत. त्यातील Moto G31 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात देखील दाखल झाला आहे. कंपनीनं या डिवाइसच्या बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवली आहे. परंतु मोटोरोला लवकरच या सीरीजमध्ये Moto G12 स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन देखील बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल.
Moto G12 ची किंमत
टिपस्टर सुधांशुनं मोटो जी12 ची माहिती दिली आहे. त्यानुसार हा फोन सर्वप्रथम युरोपियन बाजारात सादर केला जाऊ शकतो. तिथे या फोनचे दोन व्हेरिएंट सादर केले जातील. या डिवाइसच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. लीकनुसार मोटोरोला मोटो जी12 च्या बेस मॉडेलची किंमत 160 यूरो असू शकते. तर या फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट 180 युरो मध्ये विकला जाईल.
Moto G12 भारतात कधी येईल हे मात्र अजून समजलं नाही. परंतु उपरोक्त किंमत भारतीय चलनात अनुक्रमे 12,999 रुपये आणि 15,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होऊ शकते. सुधांशुनं हा फोन दोन कलर व्हेरिएंटमध्ये येईल, असं देखील सांगितलं आहे. ज्यात ब्लॅक आणि ब्लू कलर्सचा समावेश असेल.
Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले मिळतो. Moto G31 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट कंपनीने दिला आहे. तसेच डिवाइस मीडियाटेकच्या ऑक्टा कोर Helio G85 चिपसेट आणि Mali G52 GPU सह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माययुएक्सवर चालतो.
Motorola Moto G31 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा मोटोरोला फोन 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर IP52 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Moto G31 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहेत, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.